८६ वर्ष वयाच्या गणपतरावानी केली कोरोनावर मात

नांदेड : सिडको नविन नांदेड येथिल श्याम पाटील वडजे यांचे वडील गणपतराव पाटील वडजे सरकार मुळचे टेम्भुर्णी ता.नायगाव येथिल असुन संकटाला न डगमगता त्यासोबत दोन हात करण्याची नेहमीच तयारी असते. ह्यांच वय वर्ष ८६ असताना सुद्धा कोरोनासारख्या भयंकर आजारावर मात करून सुखरूप घरी परतले.

सिडको नविन नांदेड येथिल सेवानिवृत्त ग्रामसेवक यांना मागील अनेक दिवसांपासून शुगर, बीपी, अस्थमा सारखे प्रदीर्घ आजार असताना त्यांना मध्येच कोरोना ने गाठले,घरात पहिलेच एक कोरोना पोसिटीव्ह पेशंट असल्या कारणाने मुलगा श्याम हा आईच्या सेवेत एका कोव्हीड सेंटरमध्ये च होता तेवढ्यात वडिलांना रक्ताच्या उलट्या झाल्या म्हणुन त्यांच्या मित्र मंडळींनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

कालांतराने त्यांची कोव्हीड चाचणी करण्यात आली ती पोसिटीव्ह येताच त्यांना संजीवनी कोव्हीड सेंटर ला हलविण्यात आले. पेशंट चं वय आणि बाकी आजार पाहुन डॉक्टरांनी नातेवाईकाना अगोदरच सुचना केल्या समजुन सांगण्याचा अर्थातच धिर देण्याचा प्रयत्न केला,कारण पेशंट चे वय त्यांचे बाकी आजार आणि सद्य स्थितीत वयोवृध्द रुग्णांचे होणारे हाल हे सर्वपरिचित आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी केलेल्या अथक परिश्रमाने आणि पेशंट च्या निडर आणि बिनधास्त स्वभावाने कोरोनाला हरवण्यास मदत झाली.

९ दिवस हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळे रुग्णांला कोव्हीड मधुन यशस्वी रित्या बाहेर काढण्यात यश मिळाले. कुठल्याही परिस्थितीत न घाबरता पेशंट चं मनोबल खच्चीकरण न होऊ देता अनेक पोसिटीव्ह उदाहरण देत हिंमतीने कोरोनाचा सामना केल्यास त्यावर नक्कीच यशस्वीरित्या मात करून बाहेर पडु शकतो हे ८६ वर्षाच्या गणपतराव वडजे यांनी दाखवून दिले. सोबतच ७८ वर्षाच्या भागीरथीबाई गणपतराव वडजे ह्या सुद्धा कोरोनावर मात करित घरी परतल्या.

वयोवृद्ध आई वडिलांनी भयंकर आजारावर मात केल्याचं सुख अनेकांनी आनंद व्यक्त करत त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीला दाद दिली जात आहे.यात त्यांनी आयुष्यभर केलेली इमानदारीने सेवा श्याम वडजे यांचे निस्वार्थ समाजकार्य कुठेतरी नक्कीच फळाला आले अशी चर्चा सर्वत्र होताना दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one + 18 =

vip porn full hard cum old indain sex hot