June 29, 2022

७ ते ११ वयोगटांतील मुलांनाही मिळणार लस

Read Time:2 Minute, 5 Second

नवी दिल्ली : भारतातील केंद्रीय औषध नियंत्रण विभागाने कोरोनाविरोधी लस उत्पादक कंपनी सीरमला ७ ते ११ वयोगटांतील मुलांनाही लसीकरण चाचणीत सहभागी करून घेण्यासाठी परवानगी दिली आहे. सध्या भारतातही लहान वयोगटातील मुलांना कोरोनापासून सुरक्षित करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवरच या लसीकरण चाचणीस परवानगी देण्यात आली.

केंद्रीय औषध नियंत्रण संस्था सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेनच्या तज्ज्ञांच्या समितीने सविस्तर चर्चेनंतर नियमांप्रमाणे ७ ते ११ वयोगटांतील कोरोनाविरोधी लसीकरणाच्या चाचणीत सहभागी करून घेण्याची परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे सीरमने याआधीच १२ ते १७ वयोगटांतील मुलांच्या कोरोनाविरोधी लसीकरण चाचणीला सुरुवात केलेली आहे. आता यात ७ ते ११ वयोगटाचा समावेश झाल्याने या वयोगटांतील मुलांना कोरोना लस मिळण्याचा मार्ग लवकरच मोकळ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

१२ ते १७ वयोगटासंबंधीचा अहवाल औषध विभागाकडे
सीरमने १२ ते १७ वयोगटांतील लसीकरण चाचणीच्या १०० सहभागींचा अहवाल केंद्राच्या औषध विभागाला सादर केला आहे. लवकरच यावर माहिती मिळू शकते. सध्या तरी भारतात केवळ झायडस कॅडिलाच्या डीएनएवर आधारीत कोरोनाविरोधी लसीला आपत्कालीन वापराची परवानगी मिळाली आहे. ही लस १२ वर्षांवरील मुलांना देता येते.

Leave a Reply

Your email address will not be published.

three × 4 =

Close