५ लाखांपर्यंत शून्य टक्क्याने कर्ज देणार

Read Time:7 Minute, 0 Second

लातूर : राज्यातील लोकनेते यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, विलासराव देशमुख यांचे जे स्वप्न होतेग़्रामीण भागातील लोकांना आर्थिक विकास झाला पाहिजे ते स्वप्न आज ख-या अर्थाने पुर्ण झाल्याचे दिसत असून गेल्या वर्षात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न ख-या अर्थाने केले आहेत. त्यामूळेच आज जिह्यातील सहकारी सोसायटी कोटी रुपयांच्या झाल्या असून कुठल्याही कामासाठी शेतक-यांच्या आर्थिक मदतीला जिल्हा बँक धावून येईल पिक कर्ज ३ लाख रुपये शून्य टक्के दराने देत होती, आता यापुढे पाच लाख रुपयांपर्यंत शून्य दराने देणारं असल्याची घोषणा राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केली आहे. त्यामूळे राज्यात नव्हे तर देशात पाच लाख रुपयांपर्यंत शून्य दराने कर्ज देणारी लातूर जिल्हा बँक पहिली ठरली आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आँनलाईनद्वारे गुरुवारी मुख्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे चेअरमन अ‍ॅड. श्रीपतराव काकडे हे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजूळगे, संचालक अशोकराव पाटील निलंगेकर, एस. आर. देशमुख, नाथसिंह देशमुख, संभाजी सुळ, भगवानराव पाटील विजयनगरकर, अ‍ॅड. प्रमोद जाधव, व्यंकटराव बिरादार, सुधाकर रुकमे, यशवंतराव पाटील, संजय बोरा, संचालिका सौ शिवकन्या पिंपळे, सौ स्वयंप्रभा पाटील, कार्यकारी संचालक हणमंत जाधव, आँनलाईन द्वारे मुंबई येथून संचालक आमदार बाबासाहेब पाटील, चाकुर येथून एन. आर. पाटील, संभाजी रेड्डी, हरीराम कुलकर्णी, अशोक गोविंदपुरकर, अ‍ॅड. श्रीरंग दाताळ, सौ मीनाताई सूर्यवंशी, बँकेचं सरव्यवस्थापक सी. एन. उगीले, सरव्यवस्थापक तानाजी जाधव, विविध खाते प्रमूख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा बँक नेहमी पारदर्शक कारभार करीत सामाजिक बांधिलकी म्हणून जपण्याचे काम केले आहे. कोविड काळात राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटी रुपये मदत केली. बँक नफ्यात चालवत असताना बँकेच्या कर्मचारी अधिकारी यांना दिवाळी बोनस म्हणून २२ टक्के व कोव्हिड काळात अधिक काम केल्याने त्यांना बोनस व्यतिरिक्त एक महिन्याचा जादा पगार देण्याची घोषणा करत दिलीपराव देशमुख यांनी गट्सचिव यांनाही २२ टक्के बोनस जाहीर केला असून बँक दुष्काळ, कोविड आपत्कालीन काळात सुधा १०० टक्के वसुली करून एनपीए सुद्धा निरंक ठेवण्यात बँकेचे अधिकारी कर्मचारी, गटसचिव यांचा मोठा सहभाग आहे त्यामुळं त्यांचेही कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात चेअरमन अ‍ॅड. काकडे यांनी गेल्या सात वर्षांत बँकेने ठेवी वाढवून लोकांस अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला असून यापुढेही बँक शेतक-यांना सहजपणे कोअर बँकिंग सेवा देण्याचा प्रयत्न बँक करेल असा विश्वास व्यक्त केला. सभेचे वाचन कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांनी केले. विविध विषयाना सर्वसाधारण सभेत एक मताने मान्यता देण्यात आली. सूत्रसंचलन प्रा. सचिन सूर्यवंशी यांनी केले. तर आभार प्रदर्शन पृथ्वीराज शिरसाठ यांनी मांडले.

लवकरच मोबाईल व्हॅनद्वारे
कोअर बँंिकग सेवा तालुक्यात देणार
सध्या जिल्ह्यात बँकेच्या वतीने एटीम सेवा, बँंिकग सेवा १५ ठिकाणीं सुरू असून लवकरच तालुक्यात व्हॅन बँकिंग सेवा देणार असल्याचे मत व्यक्त करून लोकांना कमी वेळात अधिक सेवा देण्याचा प्रयत्न करतोय. शेतकरी, शेतमजूर याना त्रास होऊ नये यासाठी लवकरच हि सेवा देणार असल्याचे दिलीपराव देशमुख यांनी सांगितले.

जिल्हा बँक जपली पाहिजे
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ग्रामीण भागातील लोकांची मातृत्व संस्था उभी राहिली आहे. लाखो लोकांचें संसार शेतीवर अवलंबून असतात. साखर कारखाने व जिल्हा बँक यावर लाखो लोक उभे आहेत. त्यामूळे पुढील काळात सुधा पक्षीय राजकारण बाजूला ठेवून जिल्हा बँकेत समाजाच्या आर्थिक विकासाच्या प्रगतीसाठी यापुढें आपण राजकारण करू असा विश्वास दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केला. सभासदांनी यावेळी सर्व विषयाना टाळयांच्या गजरात मान्यता दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

ten + seventeen =