३५० कोटी किमतीचे ड्रग्स जप्त! पोलिसांची मोठी कारवाई! छापेमारीचे सत्र सुरुच

Read Time:2 Minute, 3 Second

कृझ पार्टीवरील कारवाईमुळे ड्रग्ससंबद्धित चर्चांना भारतात ऊधान आले होते. भारतात ड्रग्सवर बंदी असूनसुद्धा मोठ्याप्रमाणात भारतात ड्रग्सचे सेवन केले जाते. नुकत्याच गुजरातमधील द्वारकेत झालेल्या एका मोठ्या कारवाईतुन हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गुजरात पोलिसांनी आंतरराष्ट्रीय किंमतीनुसार तब्बल ३५० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत.

गुजरातमध्ये सागरी मार्गाने मोठ्याप्रमाणात अंमली पदार्थ आणले जातात. गुजरात दहशतवाद विरोधी पथक, स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष ऑपरेशनल पथकाने केलेल्या कारवाईत या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

आतापर्यंत यामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे. सलीम आणि अलीकारा असे या दोघा आरोपींची नावे आहेत. सुरुवातीला पोलिसांनी ड्रग्सची १९ पाकिटे जप्त केली. यानंतर आरोपीच्या घरुन जवळपास ४७ पाकिट जप्त करण्यात आली आहे.

द्वारकाजवळील खंभालीया येथुन हा ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. ६६ किलो ड्रग्सचा साठा पकडण्यात आला आहे. ज्यामध्ये ५० किलो ड्रग्स आणि १६ किलो हेरॉईनचा समावेश आहे. द्वारका पोलिस अधिक्षकांनी ही माहिती दिली आहे. गुजरातमध्ये सातत्याने अंमली पदार्थाविरोधात कारवाई करण्यात येते आहे. गेल्या पाच महिन्यात गुजरातमध्ये कोटींचा ड्रग्सचा साठा विविध कारवायांतून जप्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

17 − ten =