२९ महिलांना राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्कार जाहीर

Read Time:3 Minute, 8 Second

नवी दिल्ली : ८ मार्च हा दिवस महिलाशक्तीचा गौरव दिवस म्हणुन सर्वत्र साजरा केला जातो. याच महिला दिनानिमित्त केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने नारी पुरस्कार दिले जातात. यंदा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या २९ महिलांना राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील दिव्यांग कथ्थकनर्तिका सायली आगवणे, महिला सर्पमित्र वनिता बोराडे आणि सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांचा समावेश आहे.

उद्योगक्षेत्रात स्वत:च्या पायावर उभे राहून ग्रामीण भागातील तब्बल ४ हजार महिलांना उद्योजक बनवणा-या मराठवाड्यातील कमल कुंभार या एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहे तर पहिल्या महिला सर्पमित्र वनिता बोराडे या बुलडाणा येथील असून त्यांचे कार्य सर्वांना प्रेरीत करते. कथ्थक नर्तिका सायली आगवणे यांचा संघर्षमय प्रवास हा तितकाच रोमांचक असून, अंगावर काटा आणणारा आहे. या तिन्ही पुरस्कार विजेत्यांचे महाराष्ट्रातीत सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

मुख्यमंत्री ठाकरेंकडून अभिनंदन
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणा-या या २९ महिलांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार. महाराष्ट्रातील नारी शक्ती पुरस्कार विजेत्या दिव्यांग कथ्थकनर्तिका सायली आगवणे, महिला सर्पमित्र वनिता बोराडे आणि सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.

मराठवाड्यातील कुंभार यांची उत्तुंग भरारी
उद्योगक्षेत्रात स्वत:च्या पायावर उभे राहून ग्रामीण भागातील तब्बल ४ हजार महिलांना उद्योजक बनवणा-या मराठवाड्यातील कमल कुंभार या एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व असून, त्यांनी स्वत:सह इतर महिलांना रोजगार मिळून दिला आहे. यामुळे त्या निश्चितच कौतुकास पात्र असून, कोरोनासारख्या जागतिक महामारीतूनही त्यांनी रोजगार उभा करून यशाची उत्तुंग भरारी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten − 4 =