२६ जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा?

Read Time:2 Minute, 59 Second

नवी दिल्ली : सरकारचा हेतू योग्य नसल्याचा आरोप टिकैत यांनी केला. खटले अद्याप पूर्णपणे मागे घेतलेले नाहीत, असेही ते म्हणाले आहेत. भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांच्या वक्तव्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. रविवारी राकेश टिकैत यांनी शेतक-यांचे आंदोलन संपले नसल्याची माहिती दिली आहे आणि १५ जानेवारीला संयुक्त किसान मोर्चाची बैठक होणार असून, त्यात महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.

दरवर्षी २६ जानेवारीला शेतक-यांचा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येईल, असेही बोलले जात होते. मात्र, ही बातमी व्हायरल झाल्यानंतर भारतीय किसान युनियनकडून स्पष्टीकरण देण्यात आले. राकेश टिकैत यांनी २६ जानेवारीला दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा केल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. त्यापेक्षा राकेश टिकैत यांनी सांगितले की, गेल्या वर्षी २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या धर्तीवर यावेळेसही आपण आपल्या गावातील रस्त्यांवर ट्रॅक्टर मिरवणूक काढावी अशी शेतक-यांची इच्छा आहे.

भारतीय किसान युनियनशी संबंधित सौरभ उपाध्याय म्हणाले की, राकेश टिकैत यांनी सांगितले आहे की, शेतक-यांना २६ जानेवारीला ट्रॅक्टरवर तिरंगा घेऊन आपल्या गावातील रस्त्यांवर मोर्चा काढायचा आहे. यावर कोणाचाही आक्षेप नसावा. तत्पूर्वी, हरियाणातील चरखी दादरी येथे टिकैत म्हणाले की, सरकारचे लक्ष शेतक-यांच्या जमिनीवर आहे, त्यासाठी जागरुक राहण्याची गरज आहे. सरकारचा पुढचा हल्ला त्या भूमिहीन शेतक-यांवर आहे जे गुरे पाळून दूध विकून उदरनिर्वाह करतात. टिकैत म्हणाले की, खाप हा समाजाचा आरसा आहे. त्यांचा अभिमानास्पद इतिहास आहे. शेतक-यांच्या आंदोलनात संयुक्त किसान मोर्चाने खापांना वेळोवेळी पाठिंबा दिला. सर्व खाप महापंचायतीमध्ये टिकैत बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 − 4 =