January 21, 2022

२२ हजार क्विंटल सोयाबीनची आवक

Read Time:2 Minute, 35 Second

दिवाळी पाडव्याच्या दिवशी लातूरच्या आडत बाजारात २२ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनचा दर स्थिर असल्याने शेतक-यांना ५ हजार ३५२ रुपये सोयाबीनला प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत सोयाबीनला १ हजार १०० रुपये वाढता दर मिळत आहे.

लातूर जिल्ह्यात आजपर्यंत ९७२.३ मिमी पाऊस झाला आहे. या पावसाच्या जोरावर शेतक-यांनी खरीप हंगामात जमिनीतील ओलावा पाहून ९४.९४ टक्के म्हणजेच ५ लाख ८१ हजार ४४३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली होती. यात सर्वाधिक सोयाबीन ४ लाख ५६ हजार ६७८ हेक्टरवर पेरणी झाली. तसेच तूरीची ८५ हजार ६०९ हेक्टर, मूग ९ हजार १२८ हेक्टर, उडीद ६ हजार ७९६ हेक्टर, साळ २९६ हेक्टर, ज्वारीची ११ हजार ४९४ हेक्टर, बाजरी ३०४ हेक्टर, मका ३ हजार ५४६ हेक्टरवर पेरणी झाली होती. मुग, उडीद व सोयाबीन या पीकांची काढणी व मळणी होऊन आडत बाजार पेठेत शेतमाल विक्रीसाठी येत आहे. दिपावली पाडव्याच्या दिवशी लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनची २२ हजार क्विंटलची आवक झाली होती. या सोयाबीनला ५ हजार ३५२ रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

यावर्षी लातूर जिल्हयात सतत झालेल्या पावसामुळे मुग, उडीद व सोयाबीन या शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. कांही शेतक-यांची पिके पाण्याखाली गेली, तर कांही शेतक-यांची पिके डोळया देखत नदीच्या पाण्यात वाहून गेली. त्यामुळे यावर्षी शेतक-यांच्या शेत माल उत्पादनावर परिणाम झाला आहे. ज्या शेतक-यांच्या पदरात सोयाबीनचे पिक पडले आहे. अशा शेतक-यांनी शेतमाल विक्रीसाठी लातूरच्या आडत बाजारात आणले आहे. त्याला हमी भावापेक्षा अधिक दर मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 4 =

Close