
२२ जानेवारीपर्यंत मनाई कायम
नवी दिल्ली : कोरोना महामारी आणि ओमिक्रॉन संकटामध्ये उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणूका होत आहेत. येथील निवडणुकांच्या तारखांची घोषणा करताना निवडणूक आयोगाने १५ जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर बंदी घातली होती. ही मनाई निवडणूक आयोगाने २२ जानेवारीपर्यंत कायम ठेवली आहे. शनिवार दि. १५ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाने याबाबतची माहिती दिली.
कोरोना संसर्गाचे आकडे वाढत असल्याने निवडणूक आयोगाने हा महत्वाचा निर्णय घेतला. बंद हॉलमध्ये ३०० जण अथवा एकूण क्षमतेच्या ५० टक्कें लोकांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यास निवडणूक आयोगाने अनुमती दिली आहे. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणा-या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच प्रचारादरम्यान कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.
तसेच निवडणूक आयोगाने सर्व पक्ष आणि उमेदवारांना डोअर टू डोअर प्रचारासाठी परवानगी दिली आहे. तसेच व्हर्च्युअल माध्यमातून उमेदवारांन प्रचार करता येणार आहे. काही पक्षांनी तर याची सुरुवात देखील केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मतदान केंद्रावर असणारे सर्व कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल. डिजिटल, व्हर्च्युअल पद्धतीने प्रचार करावा, असेही निवडणूक आयोगाने सांगितले.