१ जानेवारी ते ३१ डिसेंबर पर्यंत करून घेणार ११ वी पूर्ण सोबतच १२ वीची संपूर्ण तयारी – टीम आयआयबी

Advertisements
Advertisements
Read Time:6 Minute, 4 Second

भावी डॉक्टरांसाठी ११ डिसेंबर रोजी “IIB महा FAST”

लातूर / नांदेड : डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून जे विद्यार्थी आगामी नीट परीक्षेची तयारी करत इयत्ता ११ वीतून १२ वी मध्ये दाखल होणार आहेत त्यांच्यासाठी डॉक्टर घडविणारी गुणवत्तापूर्ण खाण म्हणून देशभर ओळख असलेल्या आयआयबी इन्स्टिट्यूटने “IIB महा FAST” ही फ्री ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट घेण्यात येणार आहे. ११ वी तून १२ वी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे IIB इन्स्टिट्यूटमध्ये शिकण्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. यासाठी “IIB महा FAST” ही फ्री ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट ११ डिसेंबर रोजी होणार असून ही सुवर्णसंधी मिळविण्यासाठी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करावे असे आव्हान आयआयबी टीम ने केले आहे.

Advertisements

आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर व्हावी अशी अनेक पालकांची ईच्छा असते. परंतु, डॉक्टर होणे, चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणे हे अत्यंत कठीण असल्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, दर्जेदार शिक्षण, सकारात्मक वातावरणाची सर्वाधिक आवश्यकता असते. दरम्यान डॉक्टर घडविणारी फॅक्टरी, गुणवत्तेची खाण म्हणून देशभरात ओळख असलेल्या IIB इन्स्टिट्यूटमध्ये हे वातावरणात असल्याने आयआयबी घराघरात पोहचली आहे. गतवर्षीच्या नीट परीक्षा निकालात आयआयबीच्या १४७० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना देशातील नामवंत मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला आहे. तसेच ३३ विद्यार्थ्यांना बायोलॉजी विषयात ३६० पैकी ३६० गुण मिळाल्यामुळे एक विक्रम स्थापन झाला आहे. याशिवाय या वर्षीच्या म्हणजेच नीट-२०२२ मध्ये फिजिक्स सारख्या कठीण समजल्या जाणाऱ्या विषयात १८० पैकी १८० गुण मिळविणारे ४ विद्यार्थी हे आयआयबीचे आहेत. केवळ दर्जेदार शिक्षण आणि मार्गदर्शनच नव्हे तर आपल्या शैक्षणिक कार्याला सामाजिक बांधिलकीची जोड देत आयआयबी विद्यार्थी हिताचे निर्णय घेत असते. दरम्यान, नुकतेच आयआयबीच्या वतीने गुणवत्तेनुसार गुणवंत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या स्कॉलरशिप परीक्षा म्हणजेच “IIB महा FAST” च्या तारखांची घोषणा व IIB महा FAST च्या लोगो चे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध केलेल्या १००० विद्यार्थ्यांना १०० टक्के निःशुल्क मार्गदर्शन केले जाणार आहे. महाफास्ट परीक्षेतील गुणांच्या आधारे विविध बॅचसाठी प्रवेश मिळणार असून त्यात AIIMS, संकल्प, मिनीसंकल्पसह इतर बॅचचा समावेश असेल. देशातील सर्वात मोठी स्कॉलरशिप परीक्षा असलेली “IIB महा FAST” परीक्षा ही दोन टप्प्यात होणार असून यातील इयत्ता ११ वी तुन १२ वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ११ डिसेंबर २०२२ नीट पॅटर्नच्या धर्तीवर होणार आहे. जे विद्यार्थी लातूर व नांदेड येथे नीटच्या तयारीसाठी आले परंतु इतर अनेक ठिकाणी शिकवणी घेतात त्यांची परीक्षेची तयारी व्यवस्थित झाली नाही त्यांची परिपूर्ण तयारी व्हावी यासाठी यंदा आयआयबी कडून महा फास्ट परीक्षा लवकर घेण्यात येत आहे, जेणेकरून या विद्यार्थ्यांसाठी १ जानेवारीपासूनच नवीन बॅच सुरू होणार आहे. ही बॅच १ जानेवारी २०२३ ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार असून यामध्ये विद्यार्थ्यांचा इयत्ता ११ वि आणि इयत्ता १२ वीचा अभ्यासक्रमाची पूर्णपूर्ण तयारी करून घेण्यात येणार आहे.


जे विद्यार्थी सद्यस्थितीत आयआयबीमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना आयआयबी फास्ट परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. मात्र, जे विद्यार्थी आयायबीचे नाहीत परंतु त्यांना आयआयबीमधून ११ वी आणि १२ वीची तयारी पुन्हा करायची आहे त्या विद्यार्थ्यांना आयआयबी फास्ट परीक्षेसाठी
www.iibedu.com या वेबसाईटवर किंवा हेल्पलाईन क्रमांक 7304730730,7304567567 8055730730 आणि IIB नांदेड,लातूर, पुणे ऍडमिशन ऑफिस येथे रजिस्ट्रेशन
करता येईल.

“IIB महा FAST” या परीक्षेसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तीन विषय असणार आहेत. या अभ्यासक्रमावर आणि नीट पॅटर्नच्या धर्तीवर ही परीक्षा होणार आहे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *