August 9, 2022

१ ऑक्टोबरपासून कार्ड पेमेंट पद्धतीत बदल!

Read Time:5 Minute, 48 Second

नवी दिल्ली : १ ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंट सिस्टीममध्ये मोठा बदल होणार आहे. नवीन ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम ऑक्टोबरपासून लागू होण्याची शक्यता आहे. या नियमानुसार पेटीएम-फोन पेसारख्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मला प्रत्येक वेळी हप्ता किंवा बिलाचे पैसे (ईएमआय) कापण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागेल. फसवणूक टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हा बदल करण्याचे ठरवले आहे. याचा ग्राहकांना फायदा होणार असून, सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच म्हटले होते की, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) किंवा इतर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रिुमेंटस् (पीपीआय) वापरून होणा-या व्यवहारासाठी अतिरिक्त फॅक्टर ऑथेंटिकेशनची (एएफए) आवश्यकता असेल. ग्राहकांची फसवणूक आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. ब-याचदा बँकिंग व्यवहाराचे थेट मॅसेज पडतात. मग ते पैसे कुणी कपात केले आणि ते कसे वर्ग झाले, हे मॅसेज आल्यानंतरच कळते. याचा आर्थिक व्यवहारात धोका होतो. याचा विचार करूनच आरबीआयने यासंबंधी सावध पवित्रा घेत नियमावलीतच बदल केला आहे. त्यामुळे ऑता डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवरून पैसे कपात होताना प्रथम परवानगी घ्यावी लागणार, त्यानंतरच पैसे कपात करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. ग्राहकांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

ऑटो डेबिटचा अर्थ असा की, जर तुम्ही मोबाईल अ‍ॅप किंवा इंटरनेट बँकिंगमध्ये ऑटो डेबिट मोडमध्ये वीज, गॅस, एलआयसी किंवा इतर कोणतेही खर्च ठेवले असतील, तर एका विशिष्ट तारखेला खात्यातून पैसे आपोआप कापले जातात. ऑटो डेबिटचा नियम लागू केल्यानंतर तुमची बिल भरण्याची पद्धत बदलून जाईल. ऑटो डेबिटशी संबंधित सूचना तुमच्या मोबाईल क्रमांकावरच एसएमएसद्वारे पाठवली जाईल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला तुमचा चालू मोबाईल क्रमांक बँकेत अपडेट करणे आवश्यक आहे. त्यातूनच हा व्यवहार सुलभ होणार आहे, अन्यथा नियमित व्यवहारात अडथळे येऊ शकतात. मात्र, एकूणच ग्राहकांसाठी आरबीआयचा हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

आरबीआयने बँकिंग फसवणूक आणि ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेऊन ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. सध्याच्या प्रणालीनुसार डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म किंवा बँका ग्राहकांकडून परवानगी घेतल्यानंतर कोणतीही माहिती न देता दर महिन्याला ग्राहकांच्या खात्यातून पैसे कापून घेतात. यामुळे फसवणूक होण्याची शक्यता आहे. हा बदल फक्त ही समस्या दूर करण्यासाठी करण्यात आला आहे, असेही आरबीआयच्या वतीने सांगण्यात आले.

५ हजारांवरील रकमेच्या व्यवहाराला ओटीपी अनिवार्य
नवीन नियमांच्या अंमलबजावणीनंतर बँकांना पेमेंट देय तारखेच्या ५ दिवस आधी ग्राहकांच्या मोबाईलवर मेसेज पाठवावा लागेल. पेमेंटच्या २४ तास आधी रिमायंडर पाठवावे लागेल. रिमायंडरमध्ये पेमेंटची तारीख व पेमेंटची रक्कम आदी माहिती असेल. ऑप्ट आऊट किंवा पार्ट-पेचा पर्यायदेखील असेल. ५ हजारपेक्षा जास्त पैशांच्या देवाण-घेवाणीवर ओटीपी अनिवार्य करण्यात आला आहे. हा नियम १ ऑक्टोबरपासून लागू होईल, असे सांगण्यात आले.

आता या चेकबुकद्वारे पेमेंट करता येणार नाही
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे (यूबीआय) जुने चेकबुक पुढील महिन्यापासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून अवैध होतील. म्हणजेच पुढील महिन्यापासून जुन्या चेकबुकमधून पेमेंट करता येणार नाही. अर्थात, १ ऑक्टोबर २०२१ पासून ओरिएंटल बँक, अलाहाबाद बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाची जुनी चेकबुक निरुपयोगी होतील. कारण ओरिएंटल आणि युनायटेड बँकेचे विलीनीकरण १ एप्रिल २०२० रोजी पंजाब नॅशनल बँकेत झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

seventeen − nine =

Close