
१८ महिन्यानंतर सौदी अरेबिया मास्क फ्री
रियाध : कोरोना महासाथ सुरू झाल्यानंतर जवळपास १८ महिन्यानंतर सौदी अरेबियातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. करोनाबाधितांच्या संख्येत घट आणि देशाातील सर्वाधिक लसीकरण दर यामुळे १७ ऑक्टोबरपासून कोरोना निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.
करोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना निर्बंधातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास १८ महिन्यानंतर सौदी अरेबियातील नागरिक मोकळा श्वास घेणार आहेत.
सौदी अरेबियातील एकूण ३४.८ दशलक्ष लोकसंख्येपैकी २०.६ दशलक्ष नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. काही विशेष ठिकाणांना वगळता अन्य सार्वजनिक स्थळांवर मास्कचा वापर करणे अनिवार्य असणार नाही.
यामध्ये मक्केतील ग्रँड मशीद आणि मदिना येथील प्रेषित पैगंबर यांच्या मशिदीचा समावेश आहे. या ठिकाणी येणा-या सर्वांना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. दोन्ही मशिदी लोकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, सरकारच्या अॅपद्वारेच पूर्व नोंदणी करून जाता येणार आहे.
More Stories
आता शिंदे गटाकडूनच व्हीप
शिवसेनेच्या १६ आमदारांना गोव्यात हजर राहण्यास सांगितले मुंबई : पक्षात फूट पाडल्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना आमदारांविरोधात नवा डाव...
अश्वाचे पहिले गोल रिंगण बेलवाडी येथे संपन्न
इंदापूर : दोन वर्षानंतर प्रथमच झालेल्या या रिंगण सोहळ्यात वारक-यांमध्ये उत्साह दिसून आला. इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज...
देवेन्द्र फडणवीस मंत्रीमंडळात समावेश घेणार नाहीत
मुंबई : शिवसेने एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असून सायंकाळी ७.३० मिनीटांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार...
रिक्षाचालक, नगरसेवक ते मुख्यमंत्री; एकनाथ शिंदे यांचा प्रवास
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्यपाल...
फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना जागा मिळणार का?
मुंबई : राज्यात आठवडाभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षामध्ये अखेर उद्धव ठाकरे सरकार पायउतार झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राजीनामा...
काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पदभार
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी उशिरा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द...