January 19, 2022

१७ ट्रेकर्स बेपत्ता

Read Time:1 Minute, 37 Second

किन्नौर : हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात १७ ट्रेकर्स बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली. त्यानंतर किन्नौर जिल्ह्यातील चितकुलला निघालेल्या ट्रेकरच्या शोधासाठी यंत्रणा सक्रिय झाले आहे. किन्नौर प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर आयटीबीपीची टीम गुरुवार दि. २१ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास शोध मोहिमेसाठी रवाना झाली आहे. त्याचबरोबर लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधमोहीम राबवली जात आहे.

हे ट्रेकर्स १४ ऑक्टोबर रोजी उत्तराखंडच्या उत्तरकाशीला लागूनच असलेल्या किन्नौरमधील चितकुलसाठी निघाले होते. पण १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान लमखागा खिंडीत खराब हवामानादरम्यान ते बेपत्ता झाल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. लामखागा पास हा किन्नौर जिल्ह्याला उत्तराखंडमधील हर्षीलशी जोडणारा सर्वात कठीण मार्ग आहे. किन्नौरचे उपायुक्त आबिद हुसेन सादिक यांनी सांगितले की, पोलिस आणि वनविभागाची टीम घटनास्थळी पाठवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen − twelve =

Close