August 19, 2022

१५ हजार विद्यार्थी देणार ‘नीट’ची परिक्षा

Read Time:4 Minute, 31 Second

लातूर : बारावी विज्ञान शाखेच्या वैद्यकीय क्षेत्रात करिअर करु इच्छिणा-या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाची असलेली ‘नीट’ची परीक्षा आज दि. १२ सप्टेंबर रोजी होत आहे. जिल्ह्यात या परीक्षेकरीता ३६ केंद्र असून सुमारे १५ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

या परिक्षेची जय्यत तयारी झाली आहे. कोरोना प्रतिबंधक सर्व उपाययोजना परीक्षा केंद्रावर केल्या आहेत., अशी माहिती या परीक्षेचे समन्वयक पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य गिरीधर रेड्डी यांनी दिली. कोरोनच्या पार्श्वभूूमीवर ही परीक्षा होत आहे. आज जिल्ह्यातील ३६ केेंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. १५ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. दुपारी २ ते सायंकाळी ५ यावेळेत ही परीक्षा होणार आहे. ओळखपत्र, प्रवेश पत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश पत्रासंदर्भात काही अडचणी असतील त्या संबधीत केंद्रावर तातडीने सोडवल्या जातील. कोणत्याही विद्यार्थ्याला परत पाठवू नये, अशा सूचना केेंद्र प्रमुखांना देण्यात आल्याची माहिती प्राचार्य रेड्डी यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी सोबत हेवी ज्वेलरी, मोबाईल, घड्याळ आणु नये, कोणत्याही प्रकारीच पेनदेखील विद्यार्थ्यांनी सोबत आणू नये. परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रावरच पेन देण्यात येणार आहे. या परीक्षेची जय्यत तयारी झाली आहे, असेही प्राचार्य रेड्डी म्हणाले.

सर्व परीक्षा केंद्रांचे निर्जंतुकीकरण
सर्व परीक्षा केंद्रांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. कोरोनाच्या संदर्भात असलेल्या सर्व उपाय योजना सर्वच केेंद्रावर असणार आहेत. एकाच वेळी विद्यार्र्थीची गर्दी होऊ नये, म्हणून सकाळी ११ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. दीड वाजेपर्यंत हा प्रवेश असेल. विद्यार्थ्यांनी स्वत:सोबत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क, सॅनिटायझर, पारदर्शक पाण्याची बाटली आणावी.

दयानंद कला महाविद्यालय सुसज्ज
नीट परीक्षेसाठी दयानंद कला महाविद्यालयात एकूण ७२० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थी, प्राध्यापक कर्मचारी यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून सर्व परिसर स्वच्छ करून घेतला आहे. सर्व रुम सॅनिटाईझ करुन घेतल्या आहेत. प्रवेशा पासूनच विद्यार्थ्यांना अंतर राखून प्रवेश करता यावा यासाठी ठीक ठिकाणी पाऊलखुणा देण्यात आलेल्या आहेत. महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बैठक व्यवस्था बॅनर स्वरूपात लावण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रवेशद्वारावर रांगोळीने सजावट करण्यात आली आहे. एकूणच सर्व दृष्टीने उद्याच्या परीक्षेसाठी महाविद्यालय सुसज्ज आहे. या परीक्षेकरीता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी आदी परीश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

thirteen − six =

Close