June 29, 2022

१५ मेनंतरही कडक निर्बंध?

Read Time:2 Minute, 3 Second

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या रोजच्या संख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन वाढवणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सध्या राज्यात १५ मेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे १५ मेनंतर लॉकडाऊनमध्ये वाढ करणार का, असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांतील परिस्थिती गंभीर आहे. तेथील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातही कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही तशी शक्यता वर्तवली आहे.

राज्यात रुग्णांची संख्या ६०- ६५ हजारांच्या आसपास आहे. अद्याप राज्याचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला नाही. राज्यातील ३६ पैकी १२ जिल्ह्यांत पॉझिटिव्हीटी दर कमी होत आहे. पण काही जिल्ह्यांत हा दर स्थिर आहे. काही जिल्ह्यांत कोरोनाचा वाढता दर दिसत आहे. त्यामुळे तिथे कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. राज्यात लॉकडाऊन वाढवायचा की थांबायचा, याचा विचार १५ तारखेनंतरच करण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

four × one =

Close