January 21, 2022

१२ वीची ४ मार्च, १० वीची १५ मार्चपासून होणार परीक्षा

Read Time:2 Minute, 38 Second

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाचे संकट थैमान घालत आहे. या संकट काळात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. वर्गही ऑनलाईन झाले. महाराष्ट्रात आता काही प्रमाणात शाळा सुरू होत असल्याचे चित्र आहे. त्यानंतर आता राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १० वी आणि १२ वीच्या लेखी परीक्षेची घोषणा केली. त्यानुसार २०२२ साली १२ वीची लेखी परीक्षा ४ मार्च रोजी होणार असून १० वीची लेखी परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर किमान पुढील वर्षी तरी १० वी आणि १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार का? आणि होणार तर कधी आणि कशा? याविषयी चर्चा सुरू झाली होती. मात्र, आज शालेय शिक्षण मंत्र्यांनी या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केला आहे. त्यानुसार २०२२ साली १२ वीची लेखी परीक्षा ४ मार्च रोजी होणार असून १० वीची लेखी परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचे आणि शाळांना त्यांच्या अभ्यासक्रमाचे नियोजन करणे शक्य होणार आहे.

ओमिक्रॉनबाबत आपण मॉनिटरिंग करत आहोत. पण १० वी आणि १२ वी ही विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीने महत्त्वाची वर्ष असतात. या परीक्षा कधी होणार अशी विचारणा होत होती. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. १२ वीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत होईल, तर १० वीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत होईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine + eighteen =

Close