१२ किलो सोने जप्त

Read Time:45 Second

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई सीमाशुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली. सीमाशुल्क विभागाच्या अधिका-यांनी विमानतळावरून १२ किलो सोने जप्त केले.

जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. हे सोने विदेशात घेऊन जाण्यात येत होते. ते एका विशेष बेल्टच्या आतमध्ये लपवून ठेवले होते. या प्रकरणी सुदान येथून आलेल्या ६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

4 + 16 =