११ कोटींची नाणी गहाळ, सीबीआयमार्फत चौकशी

Read Time:2 Minute, 40 Second

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तिजोरीमधून तब्बल ११ कोटी रुपयांची नाणी म्हणजे चिल्लर गहाळ झाल्याची धक्कायक बाब समोर आली आहे. राजस्थानमधील मेहंदीपूर बालाजी येथील एसबीआय शाखेच्या तिरोजीतून ही नाणी गहाळ झाली आहेत. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) एफआयआर दाखल केला असून राजस्थान उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सीबीआयने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

राजस्थानमधील मेंदीपूर बालाजी येथील एसबीआय शाखेच्या तिजोरीत तब्बल १३ कोटी किमतींची एक, दोन आणि पाच रुपयांची नाणी होती. परंतु त्यातील काही नाणी गहाळ झाल्याचा संशय आल्यानंतर बँकेकडून जयपूरमधील एका खासगी कंत्राटदाराला ही १३ कोटी नाणी मोजण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या कंत्राटदाराने २२ जुलै २०२१ रोजी पैसे मोजण्यास सुरुवात केली. या नाण्यांची मोजणी केल्यानंतर तिजोरीतून ११ कोटी किमतीची नाणी गहाळ झाल्याचे समोर आहे. त्यानंतर बँकेने याबाबत १६ ऑगस्ट २०२१ रोजी राजस्थानमधील करौली येथील तोडाभीम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तिजोरीतून नाणी गहाळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर बँकेने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राजस्थानच्या कोर्टात धाव घेतली. त्यामुळे कोर्टाने ४ मार्च २०२२ रोजी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयला निर्देश दिले. त्यानुसार या चोरी प्रकरणी सध्या सीबीआय तपास करत आहे. १३ एप्रिल २०२२ रोजी सीबीआयने या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान, मोजणीनंतर बँकेच्या तिजोरीत शिल्लक राहिलेली दोन कोटी रुपयांची नाणी आरबीआयच्या कॉईन होल्डिंग शाखेत जमा करण्यात आली आहेत.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

one × 5 =