August 19, 2022

हॉटेलमधील जेवणही महागणार

Read Time:1 Minute, 58 Second

औरंगाबाद : सध्या इंधनाच्या किमती गगनाला भिडत आहेत. इंधनाच्या किमती वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. अशातच गॅसच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेलमधील जेवण देखील महागणार आहे. वाढत्या गॅस दरामुळे औरंगाबादेत हॉटेल्स असोसिएशनने २० टक्के दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

व्यावसायिक वापराच्या गॅस दरात मोठी वाढ झाल्याने हॉटेलचालकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे गॅस खरेदीसाठी अधिकचे पैसे द्यावे लागत आहेत. त्यामुळे आता हॉटेलमधील जेवण देखील महागणार आहे. औरंगाबादमधील हॉटेल असोसिएशनने २० टक्के दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढत्या महागाईच्या काळात सध्याच्या रेटमध्ये जेवण पुरवणे शक्य होणार नसल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी म्हटले आहे.

दरम्यान, या आठवड्यात हॉटेल व्यावसायिकांची बैठक होणार आहे. त्यानंतर हे दर लागू होतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत सिलेंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सोबत धान्य, पालेभाज्या सगळेच महागले आहे. त्यामुळे ही महागाई आता खूप झाली असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता दरवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचे औरंगाबाद हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

two × 3 =

Close