हैदराबाद जयपूर दरम्यान चार विशेष रेल्वे

Read Time:2 Minute, 15 Second

नांदेड दि.१ – हैदराबाद ते जयपूर दरम्यान चार विशेष रेल्वे सोडण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड मंडळ कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.

प्रवाशांची वाढती गर्दी  लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने हैदराबाद – जयपूर – हैदराबाद दरम्यान चार विशेष गाड्या सोडले असून गाडी क्रमांक ०७११५ हैदराबाद ते जयपूर जाणारी शुक्रवार दिनांक ४फेब्रुवारी आणि ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ वाजून२०मी. निघेल रविवारी पहाटे पाच वाजून पंचवीस मिनिटांनी जयपूर येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०७११६ जयपूर ते हैदराबाद जाणारी रविवारी दुपारी ३ वा.२० मी. जयपूर येथून निघेल ही गाडी मंगळवारी रात्री १वाजता हैदराबाद येथे पोहोचेल दिनांक ६ फेब्रुवारी व १३ फेब्रुवारी असे दोन दिवस ही रेल्वे धावणार आहे.

हैदराबाद जयपूर दरम्यान गाडी संख्या ०७११५ / ०७११६ हैदराबाद-जयपूर- हैदराबाद विशेष गाडी सिकंदराबाद, कामारेद्दी, निझामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खांडवा, इटारसी, भोपाल, उज्जैन, रतलाम, मंदसौर , नीमच, चीतौरगढ, भिलवाडा, बिजैनगर, अजमेर आणि फुलेरा येथे थांबेल.

वरील विशेष गाड्यांमध्ये प्रथम श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय शय्या असे डब्बे असतील अशी माहिती नांदेड जनसंपर्क विभागाने कळविली आहे..

 

Leave a Reply

Your email address will not be published.

18 + seventeen =