
‘हे’ खाल्यानंतर तुमच्या केसांची वाढ थांबता थांबायची नाही
मुंबई | स्त्रिचं सौंदर्य हे केसांमुळं जास्त उठून दिसतं. आपले केस लांब आणि काळे असावेत यासाठी कित्येकजणी आपल्या केसांवर घरगुती उपाय ट्राय करतात. तरी सुद्धा त्याचा फरक पडत नाही. पण हे असं कशामुळं होतं हे आपण जाणून घेऊयात.
केसांची काळची घेत असताना त्यासोबत आपल्या शरीराची आणि आरोग्याची (Health) सुद्धा काळजी घेणं गरजेच असतं. त्याचं कारण असं की, कधी कधी आपल्या अनारोग्यदायी आहार आणि चुकीच्या जीवनशैलीमुळं आपले केस कमी वयातच कमकुवत होऊन गळू लागतात.
काही मुलींचे केस अगदी कमी वयातच पांढरे सुद्धा होतात, त्याचं कारण असं की तुमच्या शरीरात कमी रक्त असेल त्यावेळी तुमचे केस गळतात. जेव्हा जेव्हा शरीरात रक्ताची कमी असते तेव्हा आपल्याला डाॅक्टर बीट खाण्यास सांगतात.
बीट फक्त आरोग्यासाठी नाही तर केसांसाठी सुद्धा फायदेशीर ठरतं. केस वाढीसाठी बीटाचा चांगला उपयोग केला जातो. बीटरूटमध्ये कॅरोटीनॉइड आढळते, जे टाळूमध्ये रक्त परिसंचरण वाढवते.
केसांच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही बीटरूटचा वापर अनेक प्रकारे करू शकता. तुम्ही घरी सुद्धा याचा हेअर मास्क करु शक्ता. बीटाचा रस करुन त्यामध्ये 1-2 चमचे लिंबाचा रस टाकून ते तुम्ही तुमच्या केसाला लांबपर्यंत लावा आणि एका तासानंतर शैम्पूने केस धुवा.
थोडक्यात बातम्या-
‘ती अजिबात प्रायव्हसी…’, पहिल्या पतीचा राखीबद्दल मोठा खुलासा
लाडक्या मित्राला लग्नात गिफ्ट केली कोहलीनं तब्बल ‘इतक्या’ रूपयांची महागडी कार
‘या’ कारणामुळं वाढतंय सायलेंट Heart attack चं प्रमाण!