‘हे अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन’, वेदांता प्रकल्पावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Read Time:2 Minute, 13 Second


मुंबई | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे गेल्यावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये या मुद्द्यावरून जुंपली असून आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.

महाराष्ट्राकडे येणारा प्रोजेक्ट गुजरातकडे गेल्याने विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. यावरून राजकारण रंगत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अखेर यावर भाष्य केलं आहे.

मला खेद होतो की केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत. पण असे करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन करीत आहेत, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी ट्विट करत दिली आहे.

दरम्यान, स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रीत करा, ना की अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर, असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे. तर वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल देखील फडणवीसांनी आभार मानले आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

“अजितदादांना मुख्यमंत्री करा, तुम्हाला केंद्रात मोठं पद देऊ”

…अन् तो प्रश्न ऐकताच पत्रकारांवर भडकली तापसी पन्नू

Leave a Reply

Your email address will not be published.

five × 2 =