August 9, 2022

हेलिकॉप्टर दुर्घटनेत दोन जवान शहीद

Read Time:1 Minute, 56 Second

उधमपूर : जम्मूतील उधमपूर जिल्ह्यात झालेल्या लष्कराच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचे म्हटले जात आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या पायलट आणि को पायलटना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारावेळी त्यांची प्राणज्योत मालवली. हेलिकॉप्टरने नगरोटामधून उड्डाण केले होते. खराब हवामानामुळे फोर्स लँडिंग करावे लागले आणि त्यातच हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या दुर्घटनेत लष्करातील मेजर रोहित कुमार आणि मेजर अनुज राजपुत यांनी प्राण गमावले आहेत.

धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने हेलिकॉप्टर खाली येताना दिसले. मात्र ते क्रॅश होऊन खाली कोसळले की क्रॅश लँडिंग झाले हे स्पष्ट दिसले नसल्याचे स्थानिकांनी सांगितले होते. भारतीय लष्कराकडून हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगण्यात आले होते. एका वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी हेलिकॉप्टर लष्कराचे असल्याचे म्हटले. शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. यासाठी किमान एक ते दीड तास लागेल. धुकं जास्त असल्याने शोधमोहिमेत अडथळा येत आहे असेही पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट सुरक्षित असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

3 − two =

Close