
हेक्टरी सरसकट ५० हजार अर्थसहाय्य देऊन सोयाबीनला १० हजार प्रतिक्विंटल भाव द्या.
मुख्यमंत्र्यांकडे संतोषराव आंबेकर यांची मागणी.
नांदेड: आज नांदेड जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी श्री. प्रदिप कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना युवा नेता संतोषराव आंबेकर यांनी निवेदन देऊन नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांवर ओढवलेल्या संकटाची कैफियत मांडली.
कोरोनाच्या महामारीतून बाहेर निघण्याची महाराष्ट्र धडपड करत असतनाच महाराष्ट्रला पावसाने अक्षरशा झोडपून काढले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेती अगदी जलमय झाली आहे. सोयाबीन , कापूस ,तूर या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पावसाने हिराउन नेला आहे. अशी परिस्थिती नांदेड जिल्ह्यात आहे. दुबार पेरणी करण्यासाठी सावकार, फायन्स कंपन्याचे कर्ज घेतले आणि आता अतिवृष्टीमुळे उद्भभवलेल्या संकटामुळे बळीराजा मरणाच्या दारात उभा टाकला आहे. तो या वाईट प्रसंगी सरकारकडे मोठ्या अपेक्षेने बघत आहे. तरी सरकारने नांदेड जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट 50 हजार प्रति हेक्टर या दराने अर्थसाय्य करून त्याला मरणाच्या दारातून बाहेर काढावे.
तसेच जुन महिन्यात महारष्ट्र राज्यात सोयाबीन चा भाव बाजारपेठेत 10 हजार पेक्षा अधिक होता. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात केलेली घट आणि सोयाबीन पेंडीचे 12 लाख टन विदेशातुन केलेली आयात या मुळे देशाअंतर्गत सोयाबीन चे भाव प्रचंड कोसळले असून त्या मुळे शेतकरी हवालदील झाला आहे.केंद्र सरकारने आपली विश्वासार्हता गमावलेली आहे. पण हे महाविकास आघाडी सरकार तरी शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यास समोर येते का ? हा केविलवाना प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. तरी अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मागण्या मान्य करून त्याला जीवदान द्यावे. असे प्रतिपादन संतोषराव आंबेकर यांनी माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे केले आहे. सदरील निवेदनावर मंगेश गाडगे, अंकुश आंबेकर आदींच्याही स्वाक्षर्या आहेत.