January 21, 2022

हुतात्मा शेतक-यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ३ लाखांची मदत जाहीर

Read Time:2 Minute, 9 Second

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषि कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर, तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान हुतात्मा झालेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच या आंदोलनातील पीडित शेतक-यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत केंद्र सरकारने जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्यमंत्री राव म्हणाले की, तेलंगणा सरकारने या मानवतावादी कार्यासाठी २२ कोटी रुपये दिले आहेत आणि शेतकरी आंदोलनाच्या नेत्यांना आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतक-यांची माहिती पाठवण्याची विनंती केली. आंदोलनात शेतक-यांना पाठिंबा देणा-या शेतक-यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणीही त्यांनी केंद्र सरकारकडे केली.

संसदेच्या अधिवेशनात किमान आधारभूत किमतीबाबत विधेयक आणि कायदा आणण्याची आणि भारतीय अन्न महामंडळातर्फे वार्षिक खरेदी धोरण अगोदर लागू करण्याची मागणीही राव यांनी केली आहे. वीज दुरुस्ती विधेयक मागे घेण्याची मागणी करण्याबरोबरच राव यांनी तेलंगणा सरकारने विनंती केल्यानुसार खरीपासाठी धान आणि रब्बीमध्ये उकडलेले तांदूळ खरेदी वाढविण्याबाबत केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 + 14 =

Close