ही शेवटची निवडणूक आहे असं समजून लढा- देवेंद्र फडणवीस

Read Time:1 Minute, 24 Second

Photo Credit- Facebook/Devendra Fadnavis

मुंबई । केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते अमित शहा (Amit Shaha) हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यानंतर भाजपच्या 200 पदाधिकऱ्यांची अमित शहांच्या उपस्थितीत बैठक झाली. भाजपने अमित शहांच्या उपस्थितीत आगामी महापालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्व भाजप नेत्यांना एक आवाहन केलं. आमच्यासोबत ओरिजनल शिवसेना (Shivsena) आहे, असं फडणवीस म्हणालेत.

गणेशोत्सवातही सर्व ठिकाणी भाजपचंच नाव आहे, असं समजून शिवसेनेकडून राजकारण केलं जातं. पण आपण त्यांना आता मागे टाकू. मुंबई महापालिका निवडणूक ही शेवटची निवडणूक आहे असं समजून लढा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

वॉर्ड रचना कशी असेल याचा विचार करू नका. अभी नही तो कभी नही असं ठरवा आणि काम करा, असं देखील आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

eight + 11 =