हिरकणी हटमुळे बचत गटातील महिलांना प्रेरणा मिळेल-केंद्रे

Read Time:3 Minute, 13 Second

लातूर : प्रतिनिधी

लातूर जिल्ह्यातील महिला बचत गटात उत्पादित होणा-या वस्तूंना हिरकणी हटच्या माध्यमातून कायमस्ररूपी जिल्हा परिषदेच्या परिसरात बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या हिरकणी हटमुळे जिल्ह्यातील बचत गटातील महिलांना प्रेरणा मिळून वैविध्यपूर्ण वस्तूच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळून या पुढील काळात राज्यात या हिरकणी हटचा नाविण्यपुर्ण उपक्रम इतर जिल्हा परिषदांसाठी अनुकरणीय राहील, असे प्रतिपादन जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी व्यक्त केले.

लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेसद्वारालगत जिल्ह्यातील महिला बचत गटांकडून निर्माण होणा-या वस्तू विक्री केंद्र हिरकणी हट या वास्तू निर्मितीचा शुभारंभ जि.प.अध्यक्ष राहूल केंद्रे व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, महिला व बालकल्याण सभापती ज्योती राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

लातूर जिल्ह्यातील महिला बचत गटात निर्माण झालेल्या वस्तूचा दर्जा अतिशय उत्कृष्ट असून या उत्कृष्ट वस्तूचा व महिला बचत गटाच्या कार्यामुळे लातूर जिल्हा परिषदेला पुरस्कार मिळाला आहे. या बचत गटासाठी तालुका व जिल्हा स्तरावर विक्री केंद्र सुरू करण्याबाबत सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात आला होता., असे सांगून केंद्रे म्हणाले की, बचतगटाच्या विविध उत्पादित वस्तू विक्रीसाठी बचतगटांना चांगली बाजारपेठ मिळाली पाहिजे यासाठी जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये बचत गटासाठी विक्री केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.

त्या अनूषंगाने दिलेला ठराव वास्तवरूपात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारालगत हिरकणी हट नावाने वास्तू निर्माण होणार असून यासाठी जि.प.ने १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत प्रशासकिय निधी म्हणून ५० लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आल्याचे जि.प.अध्यक्ष केंद्रे यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published.

two × 3 =