हिमायतनगरमध्ये 73 हजारांची चोरी – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर येथे घरफोडून चोरट्यांनी 73 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
बालाजी उत्तम पुरी हे छत्रपतीनगर, हिमायतनगर येथे राहतात. दि.16 जून रोजी सकाळी 10 वाजता ते आपल्या कुटूंबासोबत कांडली या गावी गेले होते. 2 दिवसानंतर 18 जून रोजी सकाळी 7 वाजता ते परत आले असता घराचा मुख्य दरवाजा उघडा होता. तपासणी केली असता घरातून 3 हजार रुपये किंमतीचा एलईडी, कपाटातील 30 हजार रुपये रोख रक्कम, सोन्याच्या दोन अंगठ्या प्रत्येकी 5 ग्रॅमच्या प्रत्येकी 10 हजार रुपये आणि 25 तोळे चांदीच्या चैन किंमत 10 हजार रुपयांचा असा एकूण 37 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 136/2024 दाखल केला असून महिला पोलीस अंमलदार कागणे अधिक तपास करीत आहेत.


Post Views: 48


Share this article:
Previous Post: मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

June 19, 2024 - In Uncategorized

Next Post: दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनाची जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात जय्यत तयारी  

June 19, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.