हिमायतनगरजवळ दरोडा – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर जवळच्या लाला पेट्रोलपंप येथे 26 जूनच्या मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्या सुमारास तिन अज्ञात दरोडेखोरांनी 2 जणांना लुटून 68 हजार 700 रुपयांचा ऐजव बळजबरीने चोरून नेला आहे.
वृषभ ज्ञानेश्र्वर उरपुडे रा. पहुर ता.आर्णी जि.यवतमाळ हे आणि त्यांचे मित्र 26 जून रोजी मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्यासुमारास लाला पेट्रोलपंप हिमायतनगर येथे लघुशंका करण्यासाठी आपल्या गाडीवरून उतरुन खाली थांबले तेंव्हा तिन अनोळखी लोकांनी त्यांच्या समोर येवून लाथाबुक्यांनी मारहाण करून रोख रक्कम, चांदीचे ब्रासलेट, हेडफोन, कानातील बाळ्या असा एकूण 68 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हिमायतनगर पोलीसांनी हा घटनाक्रम गुन्हा क्रमंाक 204/2024 नुसार नोंदवला असून पोलीस उपनिरिक्षक साने अधिक तपास करीत आहेत.


Post Views: 45






Share this article:
Previous Post: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातूनयुवक युवतीना उद्योजक होण्याची संधी

June 29, 2024 - In Uncategorized

Next Post: मैदानी चाचणी गैर हजर राहिलेल्या उमेदवारांना 4 जुलै रोजी पुन्हा एक संधी-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

June 29, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.