हिजाब आंदोलनाचे लोण शिक्षण संस्थात पोहोचवणाऱ्या समाज कंटकावर कारवाई करा! सम्यक विद्यार्थी आंदोलन ची मागणी

Read Time:3 Minute, 2 Second

 

नांदेड दि.९-  कर्नाटकामधील हिजाब विरोधी आंदोलन महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था विद्यापीठांतून पसरवून सामाजिक सौहार्द बिघडवणारे समाजकंटकावर कारवाई करण्याची सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटनेने नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे

सम्यक विद्यार्थी आंदोलन ही विद्यार्थी संघटना शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्याला भेडसावणाऱ्या प्रश्नांसाठी काम करणारी संघटना आहे. देशात ऊत्तरप्रदेशातील निवडणुकीत एका धर्माध पक्षाला मतदान व्हावे म्हणून कर्नाटक मधील काही कॉलेजमध्ये हिजाब विरोधी आंदोलन करून शिक्षणाला हिंदू मुस्लिम करणेचा प्रयत्न चालू आहे. अल्पसंख्यांकांच्या वर्गाला टार्गेट करून त्यांच्या जीवन पध्दतीवर हल्ले करणेचा प्रयत्न काही धर्मांध शक्ती कडून केला जात आहे. मुस्लिम समाजातील मुलींचे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यांची शैक्षणिक स्थिती SC/ST वर्गापेक्षा कमी आहे. अशा स्थितीत गरिब मुस्लिम पालक आपल्या मुलींना अल्पसंख्यांकांच्या संस्था असतील किंवा ईतर धर्मियांनी संस्थांनी चालविलेल्या संस्था असतील त्या ठिकाणी या मुली शिक्षण घेत आहेत. त्यांच्या जीवीताचे व अधिकाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी शासनावर आहे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. 

केरळ सारख्या राज्यांत मोठ्या प्रमाणावर मुस्लिम भगिनी त्यांच्या हिजाबमध्ये शिक्षण घेत असताना आंदोलन भाजप शासित राज्यातून सुरू होऊन ईतर राज्यांत जाणीवपूर्वक पसरविले जात आहे. त्याला राज्यांच्या सीमेवर थांबविणे आपले शासनाने सामाजिक सद्भाव कायम राहण्यासाठी समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर सम्यक विद्यार्थी आंदोलन चे जिल्हाध्यक्ष कैलास वाघमारे जिल्हा संघटक भीमराव रामजी अशोक छल्लारे प्रवीण सूर्यवंशी आदित्य हनुमंते सचिन कदम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

3 × 3 =