‘हिंमत असेल तर…’; उदयनराजे भोसले अन् शिवेंद्रराजे भोसलेंमध्ये जोरदार खडाजंगी

Read Time:1 Minute, 52 Secondमुंबई | सध्या निवडणुकीवरून अनेक राजकीय नेत्यांमध्ये टीकेचे वातावरण पाहायला मिळते. यामध्येच आता सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीवरून भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraj Bhosale) यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वाकयुद्ध पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. साताऱ्यात हे दोन्ही राजे पुन्हा एकदा आमनेसामने आले. मिशीला पीळ आणि ताव मारून काहीही होत नसतं, असा टोला उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना लगावला

सातारा विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व 50 जागा जिंकणार, असा दावादेखील उदयनराजेंनी केला. तर नगरपालिका निवडणुकीत उदयनराजेंचा कडेलोट होणार, असा दावा शिवेंद्रराजे यांनी केला आहे.

हिंमत असेल तर आजच्या आज पत्रकार परिषद घेऊन दाखवावी, असे आव्हानही त्यांनी शिवेंद्रराजेंना दिले. तसेच शिवेंद्रराजे यांच्या आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. या निवडणुकीचा निकाल आताच लागला आहे, असा दावा देखील त्यांनी केलाय.

थोडक्यात बातम्या- 

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी महत्वाची बातमी समोर, राऊतांच्या अडचणी वाढणार?

हाय गर्मी! अनन्या पांडेचा बिकनी लूक बघून चाहते घायाळLeave a Reply

Your email address will not be published.

16 − 6 =