हिंगोली समाज कल्याण सहायक आयुक्तांना मारहाण;नांदेडच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून निषेध


नांदेड :- हिंगोली येथील समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड यांना घरात घुसून मारहाण केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून तसेच या प्रकरणात सक्त कारवाई करण्याची मागणी नांदेड जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना केली.

आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी एकत्रीत येऊन हा निषेध नोंदविला. हिंगोली सहायक आयुक्त यादव गायकवाड यांना 4 जुलै रोजी रविंद्र वाडे या व्यक्तीने रात्री घरात घुसून मारहाण केली. मोबाईलवर केलेल्या व्हॅटसॲप मॅसेज व दूरध्वनीनुसार कंत्राटी भरतीमध्ये आपण सांगितलेले दोन उमेदवार का घेतले नाही यासाठी जाब विचारून घरात घुसून मारहाण केली. यामध्ये जखमी झालेले सहायक आयुक्त यादव गायकवाड यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

याप्रकरणी आज समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्रीत येऊन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन दिले.

 


Share this article:
Previous Post: नांदेड जिल्ह्यात जवळपास 12 पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षकांना नवीन ठिकाणी नियुक्त्या

July 5, 2024 - In Uncategorized

Next Post: प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 5, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.