“हा दंड आता पेंग्विन सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का?”

Read Time:2 Minute, 1 Second

PC/FB/Aditya Thackery And Ashish Shelar

मुंबई | राज्य सरकारला पर्यावरणाचे नियम न पाळल्याने दंड ठोठावण्यात आला आहे. तब्बल 12 हजार कोटी रुपयांचा हा दंड आहे. राष्ट्रीय हरीत लवाद कायद्याच्या कलम 95 अंतर्गत हा दंड ठोठावण्यात आला आहे. यावरुनच मुंबईचे (Mumbai) प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्याने राष्ट्रीय हरित लवादाने (National Green Arbitration) 12 हजार कोटींचा दंड ठोठावला आहे.  हा दंड दोन महिन्यात भरायचा आहे, असं ट्विट शेलारांनी केलं आहे.

मग आता.. सांग सांग भोलानाथ… हा दंड पालिकांमधे सत्ता असलेल्यांकडून.. अडिच वर्षे पर्यावरण मंत्री असलेल्यांकडून.. सोशल मिडियावर “पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या” पेंग्विन सेनाप्रमुखांकडून… वसूल करायचा का? असा सवाल विचारला आहे.

ट्विट करताना शेलारांनी आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) उल्लेख पेंग्विन असा केला आहे. शेलारांच्या ट्विट नंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

ten − 4 =