हा तर कॉमेडी एक्स्प्रेस सिझन-२

Read Time:3 Minute, 32 Second

नवी दिल्ली : शिंदे गटाने आज नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमिवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी शिवसेनेच्या खासदारांची बैठक पार पडली. हे खासदार शिंदे गटाच्या बैठकीला उपस्थित नव्हते. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी सध्या सुरु असलेला हा प्रकार कॉमेडी एक्स्प्रेस सिझन २ असल्याचे म्हटले आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीबाबत प्रतिक्रीया दिली, ते म्हणाले की, माध्यमात दाखवण्यात आले हा प्रकार कॉमेडी एक्स्प्रेस सिझन २ असून, कॉमेडी एक्स्प्रेस सिझन १ हे विधीमंडळात झाला आहे. ज्यावर २० तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांनी स्थापन केलेल्या खंडपीठापुढे फुटीर गटाच्या भवितव्यासंदर्भाचा निर्णय लागेल. ते पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत असलेली याचिका कायद्याच्या नियमांच्या आधारावर पक्की आहे, त्यामुळे न्याय आम्हाला मिळेल असेही राऊत म्हणाले. याच भीतीने फुटीर गटाने कार्यकारिणी जाहिर केली असल्याचे ते म्हणाले. एक गट राष्ट्रीय कार्यकारणी कशी बदलू शकतो असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.

पक्ष म्हणून मान्यता नाही
फुटीर गटाला पक्ष म्हणून मान्यता नाही ते शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करतो यावर लोक हसत आहेत, म्हणून हे कॉमेडी एक्स्प्रेस सिझन २ असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले. स्वत:ची कतडी वाचवण्यासाठी ही धडपड सुरू आहे, जे सोडून गेले आहेत, त्यांच्याशिवाय शिवसेना भक्कमपणे उभी आहे.

शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष
शिवसेनेचे नेतेमंडळ हे बाळासाहेब ठाकरे यांनी आणि कार्यकारिणीने निर्माण केले आहे. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडून नेमण्यात आलेले असतात शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष आहे. हा गट नाही, ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. अनेकांनी फूटून पक्ष निर्माण केले असतील त्यांना कार्यकारिणी बरखास्त करण्याचा कोणताही अधिकार कायद्याने अथवा इतर नियमाने नाही, त्याचा शिवसेनेवर परिणाम होणार नाही असे संजय राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

8 − seven =