हाय गर्मी! अनन्या पांडेचा बिकनी लूक बघून चाहते घायाळ

Read Time:2 Minute, 35 Secondमुंबई । बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खूप कमी काळात अनन्या पांडेनं (Bollywood Actress Ananya Pandey) आपलं स्थान निर्माण केलं. आपल्या कौशल्याने आणि अभिनयाने तिने लाखो लोकांच्या मनात घर केलं. अभिनयासोबतच अनन्याची फॅशनस्टाईल आणि लूक कायमच चर्चेत असतो. सोशल मीडियावर ती सतत ऍक्टिव्ह असते आणि कायम आपले नवीन लुक्स आणि व्हिडीओ शेअर करत असते. दिवसेंदिवस अनन्याची फॅन फॉलोविंग वाढत असताना दिसत आहे.

आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमी हटके पोझ देत फोटो पोस्ट करत असते. तिच्या प्रोफेशनल लाईफसोबत ती तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेचा विषय ठरते. नुकतेच अनन्याने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही खास फोटो टाकत त्याला ‘Capri Sun’ असं कॅप्शन दिलं आहे. (Hot PhotoShoot Of Bollywod Actress Ananya Pandey)

तीचा हा ग्लॅमरस फोटो पाहून चाहत्यांनी तिच्या फोटोला भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देखील केल्या. तिच्या या पोस्टला 5 लाखहून अधिक लाईक्स मिळत आहेत.

अनन्याने या फोटोमध्ये ग्रीन कलरची बिकनी घालून सेक्सी पोझ दिलीये. तिच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. ती सध्या इटली मध्ये आपला क्वॉलिटी टाईम स्पेंट करत असताना दिसत आहे.

अनन्या आपल्या अभिनयाने जसं लोकांच्या हृदयावर राज्य करते तसेच ती तिच्या नवीन वेगळ्या आणि हॉट फोटोने सुद्धा नेटकऱ्यांना आकर्षित करत असते. अनेक युजर्सने अनन्याच्या पोस्टवर ईमोजी टाकलेत. अभिनेत्रींच्या पोस्टवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया थांबण्याचं नाव घेत नाहीत. तिच्या लुक्समुळे ती नेहमी वर्चस्व गाजवत असते म्हणून तिची सोशल मीडियावर फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे.

Tags-

ananya pandey age , ananya pandey father, ananya pandey net worth, ananya pandey education, ananya pandey mother, ananya pandey gallery, ananya pandey instagram, ananya pandey husband nameLeave a Reply

Your email address will not be published.

13 − 10 =