August 9, 2022

हवाई दलाच्या ऑक्सिजन वाहतुकीसाठी देशांतर्गत ४०० फे-या

Read Time:1 Minute, 52 Second

नवी दिल्ली : भारतातील कोरोनाविरोधी लढ्यासाठी हवाई दल आणि नौदलही सरसावले आहे. त्यामुळे वैद्यकीय सामग्री आणि ऑक्सिजन पुरवठ्याला गती देण्यासाठी नागरी प्रशासनाला मोठे बळ मिळाले आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने वैद्यकीय यंत्रणा आणि सुविधा अपु-या पडत आहेत.

ऑक्सिजन आणि औषधांच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी चिंताजनक स्थिती निर्माण होत आहे. त्या स्थितीवर मात करण्यासाठी हवाई दल आणि नौदलाने कोरोनाविरोधी लढ्यातील योगदान वाढवले आहे. मागील काही दिवसांत हवाई दलाच्या विमानांनी ७ देशांत ५९ उड्डाणे केली. त्या विमानांनी ७२ क्रायोजेनिक ऑक्­सिजन स्टोरेज कंटेनर्स आणि १ हजार २५२ ऑक्सिजन सिलिंडर्स आणले.

एवढेच नव्हे तर, ऑक्सिजन वाहतुकीसाठी हवाई दलाच्या विमानांनी देशांतर्गत तब्बल ४०० फे-या केल्या. नौदलानेही कोरोनाविरोधी लढ्यासाठी नऊ युद्धनौका तैनात केल्या आहेत. त्या युद्धनौकांचा उपयोग परदेशांतून ऑक्सिजन, वैद्यकीय सामग्री आणण्यासाठी होत आहे. हवाई दल आणि नौदलामुळे ऑक्सिजन, वैद्यकीय सामग्रीची उपलब्धता आणि वाहतूक वेगाने होण्यास मोठा हातभार लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

2 × 4 =

Close