January 21, 2022

हल्ले रोखण्यास केंद्र सरकार अपयशी

Read Time:2 Minute, 8 Second

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार हल्ले रोखवण्यात अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत. नोटाबंदीने किंवा कलम ३७० रद्द केल्याने दहशतवाद थांबला नाही. केंद्र सरकार सुरक्षा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आम्ही आमच्या काश्मिरी बंधू आणि भगिनींवर झालेल्या या हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो आणि मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना पाठवत आहे, असे राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

याआधी बुधवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी एकापाठोपाठ एक असे तीन हल्ले केले, ज्यात औषधांचे दुकान चालवणा-या माखनलाल बिंद्रू यांच्यासह तीन जण ठार झाले. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा जम्मू -काश्मीर पोलिसांनी सरकारी शाळेवर झालेल्या हल्ल्यात दोन शिक्षकांच्या मृत्यूची माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, हे दहशतवादी अचानक शाळेत घुसले आणि त्यांनी शिक्षकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली.

जम्मू -काश्मीरच्या श्रीनगरमध्ये गुरुवारी सकाळी दहशतवाद्यांनी ईदगाह परिसरात असलेल्या शाळेवर हल्ला केला. या हल्ल्यात शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. दोघेही बिगर मुस्लिम होते. दीपक हिंदू आणि सुखविंदर कौर शीख समुदायाशी संबंधित आहेत. अशा स्थितीत खो-यात बिगर मुस्लिम किती सुरक्षित आहेत याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × four =

Close