हमीभावाने हरभरा खरेदीची मुदत नाफेडने 25 जून पर्यंत वाढवली

Read Time:1 Minute, 33 Second

मुंबई, दि. 25- राज्यात नाफेड मार्फत हमीभावाने करण्यात येणाऱ्या हरभरा खरेदीस 25 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्याची कोविडजन्य परिस्थिती आणि राज्यातील लॉकडाउन मुळे बऱ्याच शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी आणणे शक्य झाले नव्हते हे लक्षात घेऊन नाफेड मार्फत हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली होती.

अशी मुदतवाढ मिळणे बाबत पालकमंत्री अमित देशमुख यांनी पणन मंत्र्यांच्या माध्यमातून केंद्राकडे ही मागणी लावून धरली होती.त्यांच्या या पाठपुराव्यासाठी यश मिळाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने आज जारी केलेल्या आदेशानुसार पूर्वीच्याच नियमानुसार हमीभावाने करण्यात येणाऱ्या हरभरा खरेदीची मुदत येत्या 25 जून पर्यंत वाढविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

15 + four =