हदगाव – हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टी

Read Time:2 Minute, 6 Second

हदगावहिमायतनगर : तामसा, वायफना, आष्टी, पारवा भागात रविवारी झालेल्या अतिवृष्टीने पुराचे पाणी शेतात घुसले असून हजारो हेक्टर शेतीतील पिके पाण्याखाली गेली आहे. तर सोयाबीन, कापूस, अक्षरश: जमिनीसह खरडून गेला आहे.यामुळे शेतक-यांवर नुकसानीचे नवे संकट आले आहे. हदगाव – हिमायतनगर तालुक्यात रविवारी जोरदार पावसाने हजेरी लावली.सायंकाळी पाच वाजता अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाळा सुरुवात झाली. पावसाचा जोर वाढत जाऊन अतिवृष्टीचा पाऊस झाला.

यात तामसा, वायफना, आष्टी, जवळगाव, खैरगाव, वटफळी, पारवा बु, मोरगाव, कांडली बु, वडगाव, टाकराळा, मानसिंग तांडा, दरेगाव तांडा, बोरगाव ता., कांडली खु. परिसरातील हजारो हेक्टार शेतीपिकात पाणी शिरले. पावसाचा जोर एवढा होता कि पाण्याने अनेक शेतक-यांच्या शेताचे कट्टे फोडून काढले आहे. या पावसाने पिकांसह शेत जमील खरडून गेल्याने शेतक-यांचे प्रंचड नुकसान झाले आहे. शेतीच्या रानात व उसाच्या फडात देखील पाणी साचून होते. या अतिवृष्टीच्या पावसाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतक-यांच्या या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शासनाने योग्य ती मदत देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर माने पाटील पारवेकर यांच्यासह या भागातील अनेक शेतकरी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

six + ten =