हडकोत चोरट्यांचा धुमाकुळ ; दोघांचे घर फोडले

Read Time:3 Minute, 10 Second

नांदेड : प्रतिनिधी

ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिडको हडको परिसरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून सोमवारी पहाटे चोरट्यांनी दोन घर फोडुन रक्कम न मिळाल्यामुळे वस्तुंची नासधुस केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारन करण्यात आले होते.

हडको येथील पत्रकार संतोष किशनराव कराळे हे घराला कुलुप लावून कामानिमित्त गावाकडे गेले असता अज्ञात चोरट्यांनी सोमवारी पहाटे घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश केला व कपाट फोडुन लॉकर तोडले यात काही किंमती वस्तु न मिळाल्यामुळे वस्तुंची नासधुस केली आहे. शेजारील एका घराचे समोरुन कोंडीलावून चोरट्यांनी हा प्रकार केला आहे. बाजुच्या नागरिकांना आवाज आल्यामुळे त्यांनी आरडा ओरड केली तेवढ्यात चोरट्यांनी पलायन केले आहे. यात संतोष क-हाळे यांचे किंमतीवस्तु चोरीला गेले नसलेतरी कपाट तोडुन व घरातील साहित्यांची नासधुस केली आहे.

याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात त्यांनी फिर्याद दाखल केली. घटनेची माहिती मिळताचा पोलिस निरीक्षक घोरबांड यांच्या सुचनेवरुन पोलिस उपनिरीक्षक शिंदे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली व श्वान पथकाला पाचारान करुन चोरट्याचा शोध घेण्यासाठी ठस्यांचे नमुने घेतले. तर दुस-या घटनेत हडको भागातील जे-३ मधील सहशिक्षक बालाजी निरपणे यांच्या घराचे कुलुप तोडुन सोमवारी पहाटे चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाट तोडुन आत काही किंमतीवस्तु आहेत का हा शोध घेतला मात्र काही रक्कम नसल्यामुळे वस्तुंची नासधुस केली. बालाजी निरपणे यांची आई नागराबाई निरपणे ह्या घराला कुलुप लावून बाहेर गावी गेल्या होत्या याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घर फोडले. या प्रकरणी ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चोरीच्या घटनेचा श्वान पथका मार्फत शोध घेण्यात आला. सिडको हडको भागात रात्रीची पोलिस गस्त कमी झाल्यामुळे चोरट्यांचा धुमाकुळ वाढला असून पोलिसांनी तात्काळ गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

17 − seven =