स्वा.रा.ती.म. विद्यापीठात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रतिज्ञा

Read Time:1 Minute, 37 Second

नांदेड दि. २५  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये आज २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदारांसाठी ची प्रतिज्ञा घेण्यात आली. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी उपस्थित शिक्षक/ विद्यार्थी/अधिकारी व कर्मचारी यांना मतदारांसाठी ची प्रतिज्ञा दिली.

यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. राजाराम माने,
दुरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. रमजान मुलानी यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक व
शिक्षकेत्तर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. ज्ञानोबा मुंडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

two × 1 =