August 19, 2022

स्वा.रा.ती.म.मध्ये हुतात्म्यांना श्रद्धांजली!

Read Time:1 Minute, 36 Second

नांदेड दि.३०-स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दिनांक ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो या दिनानिमित्त स्वारातिम विद्यापीठात आदरांजली वाहण्यात आली.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि. ३० जानेवारी रोजी ‘हुतात्मा दिन’ निमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. व हा दिवस ‘हुतात्मा दिन’ म्हणून पाळण्यात आला.

याप्रसंगी विद्यापीठाचे उपवित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. रमजान मुलाणी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, विष्णू धनवडे, रामदास खोकले, संग्राम छले यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक/अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

17 − 14 =

Close