“स्वारातीम” विद्यापीठात संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त अभिवादन!

Read Time:1 Minute, 45 Second

नांदेड दि.२३- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि.२३ फेब्रुवारी रोजी संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, वित्त व लेखाधिकारी आनंद बारपुते, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. रमजान मुलाणी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, उपकुलसचिव डॉ. श्रीकांत अंधारे, हुशारसिंग साबळे, सहा. कुलसचिव रामदास पेदेवाड, सिनेट सदस्य उद्धव हंबर्डे, लक्ष्मीकांत आगलावे, श्याम डाकोरे, रामचंद्र शेंबोले, शिवराम लुटे, सुनिल जाधव, सुधाकर शिंदे, शिवाजी चांदणे, हरीश पाटील, उद्धव सातपुते यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

Leave a Reply

Your email address will not be published.

three × five =