
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्तारोको आंदोलन
परभणी : शेतक-यांना विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-याांसह कार्यकर्त्यांनी शुक्रवारी, दि.२५ रोजी वसमत रस्त्यावरील विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर जोरदार रास्ता रोको आंदोलन केले.
जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाची गती वाढवण्यात यावी. जाचक अटी, नियम व कागदपत्रांची मागणी बंद करावी. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना रडखडली आहे. या योजनेनुसार पात्र शेतक-यांना लवकरात लवकर लाभ द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात किशोर ढगे, गजानन तुरे, भास्कर खटिंग, केशव आरमळ, मुंजाभाऊ लोंढे, दिगंबर पवार, शेख जाफर तरोडेकर, रामेश्वर आवरगंड, उद्धव जवंजाळ, मधुकर चोपडे, अजय खटिंग, राम दुधाटे, गजानन खंटिंग, काशिनाथ शिंदे, माऊली शिंदे, रामप्रसाद गमे, आदींनी सहभाग नोंदवला होता.
आंदोलनकर्त्यांनी रास्तारोको करीत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत तब्बल अर्धा तास महामार्गावर ठिय्या दिला होता. याच ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी भोजनाचा आस्वादही घेतला. या आंदोलनामुळे वसमत रस्त्यावर वाहनांच्या दोन्ही बाजुने रांगा लागल्या होत्या.
More Stories
ओबीसी आरक्षणाबाबत समर्पित आयोगाचा नांदेड दौरा
नांदेड - महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरीकांच्या...
एन्काऊंटर ची धमकी देणारे पो. नि. अशोक घोरबांड यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आमरण उपोषण.
नांदेड - माझ्या नातेवाईकांवर केस करतोस का केस गुमान मागे घे अन्यथा तुझे एन्काऊंटर करीन अशी उघड धमकी देणारे पोलीस...
बुद्ध जयंती निमित्त शाहुनगरात पणतीज्योत रॅली व खिरदान
नविन नांदेड - सिडको-हडको वाघाळा शाहूनगर भागातून तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त भव्य पणतीज्योती रॅली काढण्यात आली व खीर दान...
कन्नड अभिनेत्री चेतना राजचे निधन
बंगळुरू : कन्नड मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री चेतना राजचे निधन झाले आहे. तिने वयाच्या २१ व्या वर्षी अखेरचा...
श्रीलंकेत १ दिवस पुरेल इतकेच पेट्रोल
आर्थिक स्थिती बिकट, पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी केले देशाला संबोधित कोलंबो : भारताचा दक्षिणकेडील शेजारी देश श्रीलंकेची आर्थिक स्थिती खराब झाली...
एकवेळ रुग्णवाहिकेचे भोंगे वाजत होते, आता तर वेगळेच वाजताहेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला मुंबई : कोरोना काळात राज्यात मंदिरे आणि प्रार्थना स्थळे बंद होती. त्यावेळी रुग्णवाहिकांचे भोंगे...