स्वयंसिद्धा महिला मंडळ परळ यांचा पारंपारिक संस्कृती जपणारा उत्सव म्हणजेच स्पर्धा मंगळागौरीच्या मोठया उत्साहात साजरा झाला!

Read Time:6 Minute, 27 Second

 

स्वयंसिद्धा महिला मंडळ परळ महिला सबलीकरणाचा वसा घेऊन मुंबई मध्ये कार्यरत असलेले, तसेच महाराष्ट्रातील विविध पारंपरिक संस्कृती जपण्यासाठी अनेक उपक्रम राबविणारे महिला मंडळ म्हणून परिचित आहे. सदर मंडळाचे दरवर्षी विविध ऋतू नुसार अनेक सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच व्यवसायभिमुख कार्यक्रम आयोजित करणे हे वैशिष्ट्य जपताना स्वतःचे घर संसार सांभाळून पारंपरिक कलेला आजच्या पिढीकडे पोहचविण्याचे फार मोठे कार्य आज या माउली अगदी सहजपणे करताना पहावयास मिळते.

दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रावण महोत्सव अंतर्गत पाककला स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळवून याही वर्षी श्रावण महिन्याचे औचित्य साधून स्वयंसिद्धा महिला मंडळ परळ यांच्यावतीने मंगळागौरीच्या स्पर्धांचा विविध रंगी समाजप्रभोधन, कलात्मक तसेच विविध वयोगटातील स्रिया व मुलींनी सादर केलेला अनोखा अविस्मरणीय कार्यक्रम दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी दामोदर हॉल परळ येथे मुबईकरांना पाहायला मिळाला. सायंकाळी ४ वाजता पाहूणांच्या उपस्थित मंगळागौरीचे पूजन रंगमंचावर करून स्वयंसिद्धाच्या महिलांनी उत्तम मंगळागौरीचे सादरीकरण करून कार्यक्रमाला सुरुवात केली.

स्वयंसिद्धा च्या अध्यक्षा, संचालिका सौ. श्रुती परब यांनी सूत्रसंचालनाची सूत्रे आपल्या हातात घेऊन प्रथम पाहुण्याचा परिचय करून दिला, सोळा हजारात देखणी फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि लावणी सम्राज्ञी आकांक्षा कदम आणि गुलजार गुलछडी आणि मराठी बाणा फेम लोककलावंतीण लावणी सम्राज्ञी विद्या सदाफुले या कार्यक्रमास परीक्षक म्हणून उपस्थित होत्या. तदनंतर विविध बक्षिसे व स्पर्धेचे नियम व अटी अधोरेखित केले. त्यानंतर प्रत्येक सहभाग घेतलेल्या समूहाने आपापले मंगळागौरीचे खेळ उत्तम रित्या सादर केले. प्रत्येक सादरीकरण पाहताना प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन कलाकारांना उत्तमरीत्या प्रतिसादही देत होते आणि टाळ्यांचा कडकडाटाने त्यांच्या कलेला दादही देत होते.

सदर कार्यक्रम पाहण्यासाठी काही प्रतिष्ठितानीही आवर्जून आपली हजेरी लावली व स्वयंसिद्धच्या वाटचालीस शुभेच्छाही दिल्या. मंडळाच्या वतीने त्यांना मान देऊन त्यांचे आदरातिथ्यही केले यात प्रायोजक सोहम असोसिएट्स आणि सुरुची गृह उद्योग, समाजसेवक, शुभेच्छुक व विशेष करून पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. तब्बल सहा तासाच्या या जुगलबंदी रुपी कार्यक्रमा नंतर वेळ आली ती अटीतटीच्या स्पर्धेच्या निकालाची यात परीक्षक म्हणून लाभलेल्या पाहुण्यांची देखील दमछाक झाली.

परीक्षक पाहुण्यांनी निकाल जाहीर करण्यापूर्वी सर्व कलाकारांचे कौतुक केले तसेच अत्यंत मौल्यवान मार्गदर्शनही केले आणि मंडळाच्या अध्यक्ष सौ श्रुती परब यांच्या विनंती वरून त्यांनी स्वतःचे छानसे सादरीकरणही केले. त्यानंतर सुरुवातीला जाहीर केल्या प्रमाणे प्रथम प्रत्येक समूहातील एक लक्षवेधी चेहऱ्याला साडीचा मान देऊन सत्कार करण्यात आला.

त्यामुळे संपूर्ण प्रेक्षागृहात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि प्रेक्षकांची तसेच सहभागी समूहांची सामूहिक बक्षिसाच्या निकालाची उत्कंठा देखील वाढली. आता अधिक वेळ वाया न घालवता पाहुण्यांनी उतरत्या क्रमाने तिसरे पारितोषिक नवरंग मंगळागौरी ग्रूप, कांदिवली या मंडळाला पाहूणांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच दुसरे पारितोषिक शिवाज्ञा मंगळागौर ग्रुप, नालासोपारा या मंडळाला पाहूणांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार केला. शेवटी प्रथम पारितोषिक रुचिरा मंगळागौर ग्रुप , ऐरोली या मंडळाला श्री. राजन साटम व उपस्थित पाहूणांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार केला.
सरते शेवटी गणपतीच्या सजावटीच्या स्पर्धेची माहिती देऊन कार्यक्रमाचा सांगता सोहळा पार पडला. सहभागी स्पर्धक आनंदाने आणि समाधानाने परतले‌ ह्यातच स्वयंसिद्धा चे खरे यश आहे. उत्तम नियोजन, शिस्तबद्ध आयोजन ह्या‌ विशेष गुणांनी स्वयंसिद्धा महिला मंडळाला ओळखले जाते. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि आपल्या रूढि परंपरांची , संस्कृतीची जपणूक व्हावी यासाठी स्वयंसिद्धा महिला मंडळ सतत प्रयत्नशील असते व कायमच राहणार यात शंकाच नाही

Leave a Reply

Your email address will not be published.

3 + sixteen =