August 19, 2022

स्वप्ने पूर्ण होण्यासाठी प्रचंड मेहनत घ्या

Read Time:2 Minute, 53 Second

मुंबई : भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने पत्नी आयेशासोबत घटस्फोट घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये सतत वाद सुरू होते. त्यामुळे लग्नाच्या जवळपास ९ वर्षांनंतर आयेशा आणि शिखर धवन यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर सर्वांनाच धक्का बसला. घटस्फोटानंतर शिखर धवनने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

शिखरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याचा फोटो शेअर केला आहे. त्यासोबतच ‘एखादे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत आणि मनापासून काम करावे लागते. आपण करत असलेल्या कामावर आपले प्रेम असायला हवे आणि आपण ते आनंदाने करायला हवे. तेव्हाच त्या कामात आपल्याला यश मिळते आणि काम करताना आनंद देखील होतो. तुमची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी प्रचंड मेहनत घ्या’ या आशयाचे कॅप्शन शिखर धवनने दिले असून त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

ऑक्टोबर २०१२ मध्ये शिखर धवनने आयेशा मुखर्जीसोबत लग्न केले होते. आयेशाचे हे दुसरे लग्न होते. आयेशाला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. शिखर आणि आयेशा यांना सात वर्षांचा एक मुलगा असून त्याचे नाव जोरावर आहे. २०१४ मध्ये जोरावरचा जन्म झाला. मेलबर्नमध्ये राहणारी आयेशा मुखर्जी लग्नाच्या नऊ वर्षांनी शिखर धवनपासून विभक्त होत आहे.

माझा दुस-यांदा घटस्फोट : आयेशा
‘‘जोपर्यंत मी दोन वेळा घटस्फोटित झाले नाही तोपर्यंत घटस्फोट हा खूप घाणेरडा शब्द असल्याचं मला वाटत होतं. शब्दांचे इतके शक्तिशाली अर्थ आणि संगती असू शकते हे मजेशीर आहे. मी घटस्फोटित म्हणून पहिल्यांदा याचा अनुभव घेतला. जेव्हा पहिल्यांदा माझा घटस्फोट झाला तेव्हा मी खूप घाबरले होते. त्यावेळी मला मी खूप काही चुकीचं करत असल्याचं वाटत होतं,’’ असे आयेशाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

14 − eleven =

Close