स्वप्नील जोशीनं बायकोसाठी घेतलेला भन्नाट उखाणा होतोय व्हायरल

Advertisements
Advertisements
Read Time:2 Minute, 36 Second


मुंबई | मराठी सिनेसृष्टीतील चाॅकलेट बाॅय म्हणून ओळख असलेला अभिनेता स्वप्नील जोशी(Swapnil Joshi) नेहमीच चर्चेत असतो. तो वैयक्तिक आयुष्यावरही दिसखुलासपणाने बोलत असतो. आताही तो त्यानं बायकोसाठी घेतलेल्या भन्नाट उखाण्यामुळं चर्चेत आला आहे.

Advertisements

शुक्रवारी स्वप्नील जोशीच्या लग्नाचा वाढदिवस आहे. यानिमित्तान त्यानं इंस्टाग्रामवर त्याच्या बायकोसाठी खास पोस्ट केली आहे. त्यानं बायको लीनासोबतच्या काही खास फोटोंचा कोलाज करून व्हिडीओ बनवला आहे. तसेच या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनद्वारे त्यानं बायकोबद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे.

कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं आहे की, हसल्याबद्दल धन्यवाद. मला कुटुंब दिल्याबद्दल धन्यवाद. आठवणींबद्द धन्यवाद. वेडेपणाबद्दल धन्यवाद. विचित्रपणाबद्दल धन्यवाद. सर्व लहान गोष्टींबद्दल धन्यवाद. देव तुला आशिर्वाद देईल. स्वप्निलनं दिलेल्या कॅप्शनवरून दोघं एकमेकांसोबत खूप आनंदी असल्याचं दिसत आहे.

त्यानं घेतलेला उखाणा असा की, घाबरून असतो बायकोला असलो जरी हौशी, कारण दात तोडायचं ऑफिशियल लायसन्स म्हणजे आमची लीना जोशी. स्वप्नीलनं घेतलेला हा उखाणा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. प्रार्थना बेहेरे(Prarthna Behere),अभिज्ञा भावे, अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar) यांच्यासह अनेक प्रसिद्ध कलाकारांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, स्वप्नील आणि लीनानं 2022 मध्ये लग्नगाठ बांधली होती. मुख्य म्हणजे स्वप्नीलनं लग्नासाठी लीनासमोर एक अट घातली होती. लग्नानंतर लीनाला त्याच्या आई-वडिलांसोबत रहावं लागेल, ही अट लीनानं मान्य केली होती.

महत्वाच्या बातम्या-

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *