‘स्वत:च्या घरात पाळणा हलत नाही म्हणुन दुसऱ्यांच्या घरात बोटं मोडायची’, शिवसेनेचा हल्लाबोल

Read Time:2 Minute, 27 Second


मुंबई । वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta-Foxcon) हा दिड लाख कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातुन गुजरातला गेला. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. या सर्व प्रकारावरून शिंदे गट (Shinde Group) आणि शिवसेना (Shivsena) नेत्यांमध्ये वार-पलटवार सुरू आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. ‘स्वत:च्या घरात पाळणा हलत नाही म्हणुन दुसऱ्याच्या घरात हलतोय तर त्यांच्या नावाने बोटं मोडायची अशा वृत्तीची औलाद महाराष्ट्राच्या नशिबात आहे हे दुर्भाग्य नाही तर काय?’ असं या अग्रलेखातुन म्हणण्यात आलंय.

वेदांता-फॉक्सकॉनसारखा प्रकल्प महाराष्ट्रात उभारला जाणार असताना आता तो गुजरात मध्ये उभारला जाणार आहे. अजून असे किती उद्योग महाराष्ट्राच्या हातातुन निसटणार आहेत हे ईडी सरकार आणि त्यांच्या महाशक्तीलाच माहिती. ही वेदांता-फॉक्सकॉनची झालेली लुट उघड केली नसती तर हा घास पचवून आणखी काही गिळले असते, अशी टीकाही सेनेनं केली.

दरम्यान, सुरत-गुवाहाटीमध्ये काही आमदार शिंदे गटास सांगत होते की, “घाबरू नका. आपल्यामागे एक महाशक्ती आहे. आता आपल्याला हवं ते मिळेल!” शाब्बास शिंदे तुम्हाला हवं ते मिळालं. पण महाराष्ट्रातील रोजगार मात्र त्या महाशक्तीने ओरबाडून नेला, असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या –

कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे दर

“देवी-देवताच मला म्हणाले, डोन्ट वरी! जा भाजपमध्ये”

Leave a Reply

Your email address will not be published.

eight + eight =