January 19, 2022

स्वच्छ सर्वेक्षणचे महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार

Read Time:4 Minute, 21 Second

नवी दिल्ली : महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षण वर्ष २०२१ चे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. सांगली जिल्ह्यातील विटा नगरपालिकेला देशात प्रथम क्रमाकांचा तर पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि सासवडने दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त केला असून, देशात स्वच्छ सर्वेक्षणाचे सलग तीन पुरस्कार पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

या तीन नगरपालिकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यासह महाराष्ट्राने स्वच्छ सर्वेक्षणात देशात दुसरा क्रमांक मिळविला आहे. पुरस्कार प्राप्त या सर्व नगरपालिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्राची ही स्वच्छता चळवळीतील कामगिरी अभिमानास्पद आहे. यातून राज्याची मान देशातही नाही तर जगातही गौरवाने उंचावली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आज विज्ञान भवन येथे केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ चा राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर, छत्तीसगड़ राज्याचे मुख्यमंत्री, मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास सचिव दुर्गा प्रसाद मिश्रा मंचावर उपस्थित होते.
राष्ट्रीय स्तवरावरील उत्कृष्ट कामगिरी करणाºया शहरांना, नगरपालिकांना, लष्करी छावण्यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले, तर इतर पुरस्कार केंद्रीय मंत्री पुरी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. तसेच केंद्रीय राज्यमंत्री कौशल यांच्या हस्तेही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आज झालेल्या पुरस्कार वितरणामध्ये एकूण पुरस्काराच्या ४० टक्के पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत.
वन स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण १४७ शहरांपैकी राज्यातील ५५ शहरे आहेत. थ्री स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण १४३ शहरांमध्ये महाराष्ट्रातील ६४ शहरांचा समावेश आहे. फाईव स्टार मानांकनामध्ये देशभरातील ९ शहरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये राज्यातील नवी मुंबईचा समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला ६ कोटी रुपयांचा धनादेश बक्ष­ीस स्वरूपात प्रदान करण्यात आला. दहा लाख लोकसंख्यावरील शहरांमध्ये देशभरातील एकूण ४८ शहरांची निवड करण्यात आली होती. त्यात राज्यातील १० शहरांचा समावेश आहे. एक ते दहा लाख लोकसंख्या असणाºया १०० शहरांमध्ये राज्यातील २७ शहरांचा समावेश आहे. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाºया १०० शहरांमध्ये राज्यातील ५६ शहरे आहेत तसेच यामध्ये पहिले २० शहरे महाराष्ट्राचीच आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × one =

Close