स्मृतीशेष शांताबाई नरहरराव सावंत यांच्या पुण्यस्मरणानिमित्त अन्नदान


नांदेड(प्रतिनिधी)-स्मृतीशेष शांताबाई स्मृतीशेष नरहरराव सावंत यांच्या 12 वा पुण्यस्मरणानिमित्त दि. 31 मार्च रोजी येथील संध्या छाया संचलित कै. रुस्तुमजी मेवावाला व कै. ताराबाई जैन वृद्धाश्रम, गजानन बाबा मंदिर जवळ तरोडा/खुर्द येथे अन्नदान करण्यात आले.

यावेळी पूजनीय भदंत शीलरत्न थेरो यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी पूजनीय भदंत शीलरत्न थेरो यांनी वृद्धाश्रमातील नागरिकांना आशिर्वाद दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते गुणवंतराव कोलत्ते हे होते. युवा उद्योजक मितांशू सुहास सावंत यांच्या तर्फे अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होेते. यावेळी प्रा. डॉ. राजकुमार सोनवणे, राजू जोगदंड, अक्षय राठोड, बौद्धाचार्य जनार्दन जमदाडे, सामाजिक कार्यकर्ते विजयदादा गोडबोले, यशवंत चिखलीकर, राजरत्न गायकवाड, प्रमोद आटकोरे, हर्षला सावंत, सुभाष काटकांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


Post Views: 43


Share this article:
Previous Post: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त निसार तांबोळी यांची आढावा बैठक

April 5, 2024 - In Uncategorized

Next Post: छाननी नंतर नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 66 उमेदवार पात्र तर 8 अपात्र

April 6, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.