स्थानिक गुन्हा शाखेने दोन ठिकाणी अफु बोंढे पकडले


नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने 31 मार्च व 1 एप्रिल रोजी शहरातील दोन ठिकाणी धाड टाकून पॉपीस्ट्रॉ(अफु बोंढे) पकडले आहेत. दोन जणांविरुध्द अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
31 मार्च रोजी स्थानिक गुन्हा शाखेने शहरातील बंदाघाट रस्त्यावर एका ठिकाणी धाड टाकली. तेथे सुरजसिंह कल्याणसिंह ठाकूर (50) याच्या ताब्यातून 2 किलो 285 ग्रॅम पॉपीस्ट्रॉ(अफु बोंढे) यांची किंमत 11 हजार 425 रुपये आहे. वजिराबाद पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा-1985 मधील कलम 8, 17, 20, 22 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेणे सुरू आहे.
1 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी तानाजीनगर भागात एका ठिकाणी धाड टाकली. त्या ठिकाणी मितसिंघ राजासिंघ मास्टर (45) याच्या ताब्यात 13 किलो 535 ग्रॅम पॉपीस्ट्रॉ (अफु बोंढे) सापडले. या अफु बोंढ्यांची किंमत 67 हजार 675 रुपये आहे.उदय खंडेराय यांच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीस ठाण्यात मितसिंघ मास्टर विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे आदींनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार बालाजी तेलंग, विठ्ठल शेळके, किशन मुळे, विलास कदम, गणेश धुमाळ, बालाजी यादगिरवाड, रणधिर राजबन्सी, धम्मा जाधव, राजू पुल्लेवार, किरण बाबर, दादाराव श्रीरामे आदींचे कौतुक केले आहे.


Post Views: 130


Share this article:
Previous Post: जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण, पेड न्यूजवर लक्ष ठेवणे ‘एमसीएमसी ‘चे प्रमुख कार्य : अभिजीत राऊत – VastavNEWSLive.com

April 1, 2024 - In Uncategorized

Next Post: महिला व बाल विकास समितीने नांदेड जिल्ह्यात होणारे चार बालविवाह रोखले

April 2, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.